PM इम्रान यांनी दिले ‘पडद्या’वर प्रवचन, पब्लिकने वायरल केला बिकनीतील मुलीसोबतचा Video

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दररोज वाढती महागाई आणि चुकीच्या धोरणामुळे देशातील लोकांच्या निशाण्यावर असतात. परंतु यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या बलात्काराच्या घटनांबाबत असे वक्तव्य केले, ज्यानंतर लोकांनी त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले.

पाकिस्तानमध्ये बलात्काराच्या वाढत असलेल्या घटनांवर तेथील पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खान यांनी महिलांना पडद्यात म्हणजेच बुरख्यात राहण्याचा सल्ला दिला, ज्यानंतर ते लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. लोकांनी सोशल मीडियावर त्यांचे जुने छायाचित्र पोस्ट केले आणि त्याद्वारे आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

 

 

 

जी छायाचित्रे शेयर करून लोक इम्रान खान यांच्यावर निशाणा साधत आहेत ती छायाचित्रे इम्रान खान यांच्या क्रिकेट करियरच्या दिवसातील आहेत ज्यामध्ये ते समुद्र किनार्‍यावर बिकनी घातलेल्या महिलेसोबत दिसत आहेत. महिलांना पडद्यात राहण्याचा सल्ला देण्याच्या त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे.

इम्रान खान यांनी वादग्रस्त आणि महिलाविरोधी मानले गेलेले वक्तव्य अशावेळी केले आहे जेव्हा ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यांनी म्हटले, देशात वाढत असलेल्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी आपल्याला पडदा प्रथेच्या संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे लागेल.

इम्रान खान एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी अश्लीलता पसरवण्यासाठी भारत आणि युरोपसारख्या देशांना जबाबदार ठरवले. त्यांनी म्हटले, दिल्लीला रेप कॅपिटल म्हटले जाते आणि युरोपमध्ये अश्लिलतेने त्यांची कौटुंबिक व्यवस्था बरबाद केली आहे.