काश्मीर प्रश्नी सर्वत्र तोंडावर पडल्यानंतर पाकिस्तानची जर्मनीकडे ‘दया’याचना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी शुक्रवारी जर्मनीच्या चांसर्लर अंजेला मार्केल यांना फोन लावून काश्मीर मुद्यावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान इमरान खान म्हणाले की, भारताकडून रद्द करण्यात आलेल्या जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यामुळे शांती आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मार्केल यांनी सांगतिले की, आम्ही या मुद्यावर लक्ष ठेवून आहे. परंतू भारताने आपली भूमिका जगासमोर स्पष्ट केली आहे.

भारताने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्ट केले आहे की, जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जा रद्द करणे हा अंतर्गत प्रश्न आहे. याशिवाय पाकिस्तानला सत्यता स्वीकारण्याचा सल्ला दिला. विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी मालदीवला काश्मीर मुद्याची माहिती दिली. तसेच मालदीवला शांति आणि स्थिरता तसेच वादाचे समाधान करण्यासाठी भूमिका घेण्याची विनंती केली.

शाहिद यांनी कुरैशी यांना सांगितले की, मालदीवला मान्य आहे. भारतीय संविधानच्या कलम 370 च्या संबंधात भारताचे हे अंतर्गत प्रकरण आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगतिले की शाहिद यांनी टेलीफोन कॉल केल्याबद्दल कुरैशी यांचे धन्यवाद मानले आणि सांगतिले की भारत आणि पाक मालदीवचे जवळचे मित्र आहेत. शाहिद यांनी मतभेद शांततापूर्ण आणि सहमतीने हे प्रकरण सोडवावे यावर जोर दिला.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like