भारतावर ‘शिरजोर’ होण्याच्या नादात UNGM मध्ये इम्रान खानकडून ‘घोडचूक’, झालं हसू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतावर निशाणा साधण्यावरून केलेल्या वक्तव्यांमुळे इम्रान खान यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रात स्वतः ची थट्टा करून घेतली आहे. यामुळे इम्रान खान यांना नेटकऱ्यानी चांगलेच धारेवर धरले आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना इम्रान खान यांनी मोदींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट मोदी’ असा केला होता. त्यामुळे ट्विटरवरती इम्रान खान यांना ट्रोलला सामोरे जावे लागत आहे.

इम्रान खान यांच्या या चुकीवर ट्विटवर एकाने लिहिले आहे, इम्रान खान हे मोदींना इतके घाबरले आहेत की, त्यांनी थेट पंतप्रधानांना राष्ट्रपती करून टाकले आहे.
तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘मोदी हे आता भारताचे राष्ट्रपती आहेत’. तसेच इम्रान खान यांच्यावर अनेक पाकिस्तानी नागरिकांनी देखील प्रश्न विचारले आहेत.

खान यांनी संयुक्त राष्ट्रात बोलताना काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करताना पुन्हा एकदा अणुयुद्धाची पोकळ धमकी दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर कर्फ्यू हटवल्यावर मोठा रक्त संहार होऊ शकतो. असे मत इम्रान खान वारंवार व्यक्त करत आहेत. अणू युद्धाची धमकी देत इम्रान खान म्हणाले की मी जरी काश्मीरमध्ये बंदी वासात असतो तर मीही पन्नास दिवसानंतर हातात बंदूक घेतली असती.

ही पहिलीच वेळ नाही की इम्रान खान यांना चुकीच्या वक्तव्यांमुळे ट्रोल व्हावे लागले आहे. या आधीही इराणमध्ये एका व्यावसायिक प्रतिमंडळाला संबोधित करत असताना म्हंटले होते की जपान आणि जर्मनी हे देश शेजारी आहेत. ज्याचा लांब लांब पर्यंत संबंध येत नव्हता त्यामुळे इम्रान खान यांना ट्रोल व्हावे लागले होते.

Visit : Policenama.com