अभिनेता इमरान खानपासून वेगळं राहत असलेल्या पत्नी अवंतिकानं शेअर केली पोस्ट, म्हणाली – ‘लग्न अन् घटस्फोट दोन्ही…’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड ( Bollywood) अभिनेता इम्रान खान ( Imran Khan) मागील दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. त्याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील सर्व काही ठीक नसल्याचे समोर येत आहे. इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक( Avantika Malik ) यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद सुरु आहेत.

https://www.instagram.com/imrankhan/?utm_source=ig_embed

मिळालेल्या माहितीनुसार दोघे घटस्फोट ( Divorce) घेणार आहेत. यासंदर्भात अवंतिकाने सोशल मीडियावर( Social Media ) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे वेगळे राहिल्यानंतरही दोघांच्या नात्यातील कटुता संपलेली नाही.अवंतिकाने आपल्या पोस्टमध्ये लिहिल आहे कि, लग्न करणं कठीण आहे आणि घटस्फोट देखील, आपण आपली स्वतःची कठीण गोष्ट निवडू शकता.

https://www.instagram.com/avantikamalik18/?utm_source=ig_embed

यानंतर अवंतिकाने जीवनाच्या कठीण परिस्थितीबद्दल सांगितले आहे. अवंतिकाच्या या पोस्टनंतर दोघांच्या नात्यात अजूनही काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अवंतिका आणि इमरान खानच्या नात्यात दीर्घकाळापासून मतभेद सुरु आहेत. 2019 च्या जूनमध्ये अवंतिकाने इमरानचे घरं सोडून आईकडे राहायला गेली असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून दोघे वेगळेच राहत आहेत.

You might also like