home page top 1

पाकचे पंतप्रधान इम्रान खानची पुर्वाश्रमीची पत्नी रेहम खान नरेंद्री मोदींची ‘भक्‍त’, पाकला दाखवला ‘आरसा’

नवी दिल्ली वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदीची वाहवाह चक्क पाक पंतप्रधान इमरान खान यांच्या पूर्वाश्रमी पत्नी रेहम खान यांनी केली. त्या पंतप्रधान मोदींच्या चाहत्या झाल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांनी त्यांचे आधीचे पती असलेले पीएम इमरान खान यांना सवाल विचारला की, देशाची अर्थव्यवस्था इतक्या वाईट अवस्थेत का आहे ?

रेहम खान यांच्या एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्यात त्या म्हणाल्या, आज पंतप्रधान मोदी सरकार लोकांना का योग्य वाटते, का लोक त्यांच्याशी नाते खराब का करत नाही, कारण त्यांची अर्थव्यवस्था मजबूत आहे, सौदीने गुंतवणूक केली, यूके त्यांच्या सोबत आहे, अमेरिका त्यांच्यात स्वारस्य दाखवते. जेथे मोदी जातात तेथे त्यांना मान सन्मान मिळतो.

रेहम म्हणाल्या की, यूएई मध्ये त्यांना मेडल मिळाले तर तुम्हाला त्रास झाला, तुम्ही भीख मागत फिरत आहात. तुम्ही म्हणालात की ते तुमच्या पायातील बूटासमान आहेत, तर मग ते तुम्हाला मानसन्मान कसे देतील.

पाकने घेतलेत अनेक कर्ज –

पाकने आज पर्यत बरेच कर्ज घेतले आहेत. मार्च 2019 पर्यंत पाकवर 85 बिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 6 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. पाक कायमच पश्चिमी देशांकडून आणि मध्यपूर्व देशांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेते.
पाकला सर्वात जास्त कर्ज चीनने दिले आहे, आता पाक IMF कडून कर्ज घेणार आहे. IMF कडे पाकने 6 बिलियन डॉलरचा मदत निधी मागितला आहे. परंतू IMF ने पाकसमोर काही अटी ठेवल्या आहेत. ती अशी की या आर्थिक वर्षात पाकच्या आर्थिक कोट्यात 40 टक्के फायदा व्हायला हवा.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like