इमरान खान यांचे वक्तव्य, म्हणाले – ‘भारतीय सिनेमे लोकांना आवडतात पण अश्लील आहेत

पोलिसनामा ऑनलाइन –भारतीय सिनेमांसाठी पाकिस्तानात बंदी आहे. असे असले तरी तिथले नागरिक मात्र पायरेटेड कॉपीजच्या मदतीनं भारतीय सिनेमे पहात आहेत. पाकच्या नागरिकांना भारतीय सिनेमा असेल मालिका असेल त्या आवडत आहेत. परंतु पाकचे पंतप्रधान इम्राान खान यांना मात्र हेच सिनेमे अश्लील वाटत आहेत.

पीटीव्ही या पाकच्या वाहिनीवर तुर्कीतील मालिका दिरील एर्तुगरल प्रक्षेपित करण्यात आली. यावेळी या मालिकेचं कौतुक करताना इम्रान खान म्हणाले, “हॉलिवूड किंवा बॉलिवूड अशा थर्ड पार्टीच्या कार्यक्रमांपेक्षा अशा मालिकांच्या मदतीनं तरुण पिढी इस्लामिक इतिहास, मूल्य आणि संस्कृतीबद्दल शिकतील.” इम्रान खान यांचं असं मत आहे की बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमात पाश्चात्य संस्कृतीला प्रोत्साहन दिलं आहे.

आता जरी इम्रान खान यांना बॉलिवूड सिनेमे आवडत नसले तरी क्रिकेटर असताना तेही भरातीय सिनेमांचे चाहते होते. अनेक बड्या कलाकारांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

इम्रान खान यांच्या मते, भारतानं पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारली आहे. म्हणून त्यांच्या सिनेमात आणि मालिकांमध्ये अश्लीलता दाखवली जाते. काही दशकांपूर्वी भारतीय सिनेमे असे नव्हते. या अश्लीलतेचा युवा पिढीवर वाईट परिणाम होतो ज्यामुळं ते सक्स क्राईमकडे वळत आहेत असंही ते म्हणाले.