इम्तियाज अली करणार कोरिओग्राफी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

जब वी मेट, रॉकस्टार ,हायवे अशा दमदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे इम्तियाज अली ‘लैला- मजनू’ या चित्रपटाच्या निमित्ताने कोरिओग्राफीत पदार्पण करत आहे.रुपेरी पडद्यावर प्रेमकथा अत्यंत प्रभावीपणे मांडणारा दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अली ओळखला जातो.

इम्तियाज अलीचा भाऊ साजिद अलीने ‘लैला मजनू’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर दिग्दर्शक म्हणून साजिदचा हा पहिलाच चित्रपट आहे. याची पटकथा इम्तियाजने लिहिली असून ‘सरफिरी’ या गाण्याची कोरिओग्राफी त्याने केली आहे.कोरिओग्राफी क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या इम्तियाज गाण्यांच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल सुरुवातीपासूनच आवड असल्याचं त्याने सांगितलं.
[amazon_link asins=’B07DN39H94,B07F41K6SN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0a8d406-a76d-11e8-8945-7f3496f53834′]
”लैला मजनू’ या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि अविनाश तिवारी हे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. यातलं श्रेया घोषालच्या आवाजातील ‘सरफिरी’ हे गाणं काश्मीरमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. ७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.