मशिदीवरच्या ‘भोंग्यां’चा त्रास आता व्हायला लागला का, MIM खासदाराचा राज ठाकरेंना ‘सवाल’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेच्या पहिल्या अधिवेशनात आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही तर मग नमाजाचा त्रास लोकांना का ? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राज ठाकरे यांच्या विधानावरून एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. तसेच राज ठाकरे एवढी वर्षे राजकारणात आहे. त्यांच्या कानांना आताच मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास व्हायला लागला का असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या भाषणात धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे कशाला हवेत ? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का ? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. यावर इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे.

जलील म्हणाले, राज ठाकरे मागील अनेक वर्षापासून राजकारणात आहे. मात्र, त्यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतो. शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळं आता हिंदुत्वाचा मुद्दा कोण हाती घेणार, असा प्रश्न होता. तो मनसेनं घेतला आहे. हे केवळ राजकारण आहे. त्यांना हे आधी का आठवले नाही असे जलील म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा –