उद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन –  लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाकडून खासदार इम्तियाज जलील निवडून आल्यानंतर दररोज काही ना काही वादग्रस्त घडामोडी घडत असून शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील वाद शिगेला पेटला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जलील यांना घरात घुसून मारण्याची भाषा बोलली गेल्यानंतर खासदार जलील यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हटले होते ‘सामना’ मधील लेखात :

जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून महापालिकेत झालेल्या गोंधळानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधील लेखात उद्धव ठाकरेंनी ‘संभाजीनगरात हैदोस सुरू…तर घरात घुसून मारू!’ अशा शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात एमआयएम वर जोरदार हल्ला चढविला आहे. आमच्यातीलच एकाने केलेल्या दगाबाजीमुळे शिवसनेचे नेते चंद्रकात खैरे यांचा निसटता अपघाताने पराभव झाला असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावरही निशाणा साधला होता. मात्र, केवळ या एका पराभवामुळे हिंदू नामर्द बनला असे समजू नका. हिंदुच्या रक्षणासाठी ‘औरंगाबादे’त घरात घुसून मारू. औरंगाबादच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील, असा धमकीवजा इशारा सामनामधून देण्यात आला आहे.

खासदार जलील काय म्हणाले प्रत्युत्तरात :

आज झालेल्या पत्रकार परिषदेत जलील यांना सामना मधील अग्रलेखाबद्दल विचारले असता त्यांनी ‘सामना’ला कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे. सामनाकडून अशाच गोष्टी अपेक्षित असून घरात घुसून मारायला आम्ही काही लहान मुले नाही आहोत. सामना कडे लोक वृत्तपत्र म्हणून पाहत नसून केवळ एक मनोरंजनाचे साधनच समजतात. शिवसेनेचे कार्यकर्तेही सामनामधील अग्रलेख केवळ वाचून दुर्लक्षित करतात. कित्येकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील ‘सामनाकडे काही जास्त लक्ष देऊ नका’ असे म्हटलेले आहे. मुख्यमंत्री तर त्यांचे साथीदार आहेत तरीदेखील असे म्हणतात. असे असताना आम्ही या गोष्टीस अजिबात महत्व देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिनेजगत

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

Loading...
You might also like