उद्धव ठाकरेंनी पराभवाची सवय करून घ्यायला हवी ; MIM च्या इम्तियाज जलील यांचा ‘सल्ला’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि भाजप युतीला यश आले. मात्र औरंगाबादमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवाचा धक्का हा थेट मातोश्रीलाही लागला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तर चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव आहे, असं म्हटले. त्यावर उद्धव ठाकरेंनी पराभवाची सवय करून घ्यायला हवी, असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करून घ्यायला हवी. एमआयएमचा विजय झाल्याने आता राज्यभर चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही शिवसेनेचा पराभव करू. तेव्हाही वंचित बहुजन आघाडीच औरंगाबादमधील सातही जागा जिंकेल, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. तसंच हे शिवसेनेला खुले आव्हानच आहे.

उद्धव ठाकरे रविवारी जालन्यात दुष्काळी दौऱ्यावर आले होते. शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावातील चारा छावण्यात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप केले. तेव्हा त्यांनी चंद्रकांत खैरेंच्या परावभवावर आपले मनोगत व्यक्त केले. तुमचा पराभव हा माझा पराभव आहे. खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खैरेंना विश्वास दाखवला. औरंगाबाद उघड्यावर सोडणार नाही. पुन्हा औरंगाबादवर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.तुम्ही मला मतं दिली. पण मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होत नाही. म्हणून लोकसभा निकालानंतरही मी तुमच्यासमोर आलो आहे. शेतकऱ्यांना मदत केली नाही तर मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे. मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडणार ही योजना खूप चांगली. जनतेच्या आशीर्वादाशी कधी गद्दारी करणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, राज्यात विधानसभेला काही महिन्यांचा अवधि उरला आहे. तोच केंद्रात आणि राज्यात सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात औरंगाबादमध्ये विधानसभेच्या प्रचाराला एकार्थी सुरुवात झाली आहे, असच चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे आता लोकसभेत युतीला जसे यश मिळाले तसंच पुन्हा मिळेल का यावर चर्चा सुरु आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

Loading...
You might also like