Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | ‘शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा’; इम्तियाज जलील यांचा पवारांवर निशाणा !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day 2022) औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेतली. राज ठाकरे यांनी या सभेमध्येही भोंग्यांवरून आक्रमक पवित्रा घेत ईद आहे म्हणून 3 तारखेचा अल्टिमेटम 4 मे ला दिला आहे. 4 तारखेनंतर कोणाचंही ऐकून घेणार नसून एकदाच काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Imtiyaz Jaleel on Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.

 

ईदच्या (Ramazan Eid 2022) आधी घाणेरडं राजकारण करण्यासाठी गृह मंत्रालयाने राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली.
गृह मंत्रालय हे राष्ट्रवादीकडे आहे, त्यांना ईदनंतर सभा घ्या असं सांगता आलं असतं.
मात्र मनसे मजबूत व्हावी, शिवसेना (Shivsena) कमकुवत व्हावी ही पवारांची (Imtiyaz Jaleel on Sharad Pawar) इच्छा आहे,
तसं झालं तर आघाडीतील सर्वात मजबूत पक्ष आम्ही आहोत असा दावा पवार आणि गँग करेल, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

 

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुस्लिम समाजाने कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, कारण देशात लोकशाही आहे हुकूमशाही नाही,
असं जलील म्हणाले.

 

दरम्यान, आम्ही महापुरुषांच्या नावानं राजकारण करत नाही आणि त्यांच्या नावानं दुकानही चालवत नसल्याचं म्हणत जलील यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला.

 

Web Title :- Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | NCP Chief sharad pawar promoting raj thackeray for weakening shiv sena claims mim mp imtiaz jaleel

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा