शिवसेनेच्या गडाला ‘सुरूंग’ लावणार्‍या MIMच्या खा. इम्तियाज जलील यांनी घेतली मराठीतून ‘शपथ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज, सोमवारी (१७ जून) लोकसभेवर निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेले एकमेव उमेदवार इम्तियाज जलील यांनी पद आणि गोपनियतेची शपथ मराठी भाषेत घेतली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथ विधी कार्यक्रम घेण्यात आला. या शपथ विधी कार्यक्रमात विविध राज्यातून निवडून आलेल्या खासदारांनी त्यांच्या भाषेत शपथ घेतली. भाजपाच्या अनेक खासदारांनी संस्कृत आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. भाजपच्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली तर केंद्रीय मंत्री हरमनप्रीत कौर यांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली. मराठवाडयातील अनेक खासदारांनी मराठी भाषेत शपथ घेतली.

२० वर्षांपासून शिवसेना पक्षाने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा गड राखला होता. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून इम्तियाज जलील निवडून आले. जलील यांनी मराठी भाषेत शपथ घेऊन आपल्या संसदीय कार्याची सुरुवात केली.

‘विधानसभा २०१४ ला औरंगाबाद मध्यमधून निवडून गेल्यानंतर विधानसभेत जलील यांनी मराठी भाषेत शपथ घेतली होती. राज्यभाषा मराठी आहे. यामुळे संसदेत मराठी भाषेत शपथ घेतली’, असं जलील म्हणाले. मराठी भाषेत शपथ घेतल्याबाबत त्यांनी अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like