६० वर्षात तुम्हाला साधी मुतारी बांधता आली नाही : संभाजी पाटील निलंगेकर यांचा हल्लाबोल

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – भारतातील डाळीचा भाव लातूरमधून ठरतो. लातुरची बाजारपेठ ही लातुरचा आत्मा. मात्र या बाजारपेठेत ६० वर्षात तुम्हाला मुतारी बांधता आली नाही. तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारता. अशी खरमरीत टीका संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांचं नाव न घेता केली.

लातूर येथील मार्केट यार्ड मधील सभेत संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. आता मतदान शृंगारे, संभाजी पाटील यांना नाही तर नरेंद्र मोदी यांना देणार आहात. आयुष्यमान भारत योजने अंतर्गतच कार्ड मी दिल नाही. तर मला पुन्हा मतदान करू नका. अस आवाहन त्यांनी सभेतील जनतेला केलं. काँग्रेसच्या उमेदवारांन आपलं नाव बदललं. ज्यांनी आपलं नाव बदललं ते आपले होऊ शकत नाहीत. असा टोला काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना लगावला.

Loading...
You might also like