80 च्या दशकात आम्ही अमेरिकेच्या CIA मार्फत ‘मुजाहिद्दीन’ला ‘जिहाद’चं ट्रेनिंग दिलं : पाक पंतप्रधान इम्रान खान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर मान्य केले की, अनेक दहशतवादी संघटना आमच्या देशात आमच्या जमिनीवर निर्माण झाल्या. इमरान यांनी मान्य केले की 80 च्या दशकात सोव्हिएत संघाच्या विरोधात पाकिस्तानने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. त्यांनी यासाठी अमेरिकेला दोषी मानले आहे.

इमरान म्हणाले की, जेव्हा सोव्हिएत संघाने अफगाणिस्तान ताब्यात घेतला होता तेव्हा या मुजाहिद्दीन यांना जिहादसाठी तयार करण्यात आले. यासाठी फंडिंग अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून CIA कडून देण्यात येत होते.

अशा प्रकारे जिहादला म्हणले जाऊ लागले दहशतवादी-

अमेरिकावर टीका करताना इमरान म्हणाले की, जेव्हा दहावर्षानंतर अमेरिका जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आली तेव्हा मात्र जिहादला दहशतवादी म्हणले जाऊ लागले. हा मोठा अपमान होता. मला वाटते की पाकिस्तानला तेव्हा तटस्थ राहायला हवे होते. कारण या संघटनांमध्ये सहभागी होणे आम्हाला नुकसानकारक ठरले आणि आम्ही आमचे 70 हजार लोक गमावले. आम्हाला 100 अरब डॉलरचे नुकसान झाले.

इमरान म्हणाले की, अखेर अमेरिकेने आम्हाला दोष दिला की पाकिस्तानमुळे ते अफगाणिस्तानमध्ये यशस्वी होऊ शकले नाही. हे पाकिस्तान बरोबर अयोग्य घडले.

पाक-अमेरिका संबंध दूरावताहेत ? –
पाक-अमेरिकेच्या नात्यात दूरावा आला आहे. एक वेळ होती जेव्हा अमेरिका युद्धाच्या दरम्यान पाकला शस्त्रास्त्रे पुरवत होती, त्यांचे समर्थन करत होती. परंतू आता परिस्थिती बदलली आहे. आज अमेरिका भारताशी संबंध चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेवरुन हे स्पष्ट झाले.

आरोग्यविषयक वृत्त –