किंगफिशर नंतर बंद होणारे ‘जेट एअरवेज’ हे दशकातील दुसरे ; जाणून घ्या ‘या’ ९ मोठ्या गोष्टी

नवीन दिल्ली : वृत्तसंस्था – नामांकित विमान कंपनी किंगफिशर बंद पडल्यानंतर आता जेट एअरवेज देखील दुसरी बंद पडलेली कंपनी आहे. विजय माल्ल्याची किंगफिशर कंपनी २०१२ मध्ये बंद पडली होती. त्यानंतर आता २६ वर्षे सेवा देणारी जेट एअरवेज देखील बंद पडली आहे. जेट एअरवेज ची ही अवस्था बँकांचे कर्ज न फेडल्यामुळे झाली आहे. नरेश गोयल यांची ही कंपनी पुन्हा एकदा उड्डाण करेल अशी आशा वर्तवण्यात येत आहे. चला केवळ ९ मुद्द्यांमधून जाणून घेऊया जेट एअरवेजची कहाणी

१) चार महिन्यात घटली 119 विमानं

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या बाबतीत जेट एअरवेज सर्वात मोठ्या एअरलाईन्सपैकी एक होती. डिसेंबर २०१८ पर्यंत जेट एअरवेज जवळ बोईंग ७७७ एअरबस A३३०, सिंगल B७३७ आणि टर्बोप्रॉप एटीआर सहित एकूण १२४ एअरक्राफ्ट होते. कंपनी प्रत्येक दिवशी जवळपास ६०० फ्लाइट्स ऑपरेट करत होती. कंपनीने १८ एप्रिल २०१९ ला केवळ पाच विमानांचे उड्डाण केले.

२) प्रवाशांची काळजी

नागरी विमानचालन मंत्रालयाने सांगितले आहे की, प्रवाशांना रिफंड रद्द करणे आणि प्रवाशांची बुकिंग संबंधित सर्व कामे सखोलपणे आणि सध्याच्या नियमांच्या आधारावर सुनिश्चित केले जातात. तुमच्या तक्रारींना त्वरित एयर सर्विस पोर्टल किंवा मोबाइल ऐप वर नोंदवा असे मंत्रालयाने सांगितले. मंत्रालय त्याची त्वरित दखल घेतील.

३) विमानाच्या भाड्यावर सरकारची नजर

जेट एअरवेज बंद झाल्यामुळे इतर कंपनीच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेषतः परदेशातील विमान प्रवास महागल्याचे दिसून आले. लंडन ला जाण्यासाठी आधी ३७ हजार रुपये तिकीट होते मात्र आता त्याची किंमत १.८०लाख रुपये झाली आहे. गुरुवारी एअरलायन्स आणि विमानतळांची बैठक बोलवण्यात आली आहे. जेट जवळ देशभरात ४०० डिपार्चर स्लॉट आहेत. ज्याचा उपयोग केला जात नाही. यात दिल्ली आणि मुंबई साठीचे ८० स्लॉट्स आहेत.

४) २२,००० कर्मचाऱ्यांवर संकट

देशातील सर्वात मोठ्या एअरलाईन कपंनीने व्यवहार चालू राहण्यासाठी बँकांकडून ४०० करोड रुपये इमर्जेंसी फंडिंग ची आपल्या केली होती. पण बँकांनी पैसे नाही दिले. जेट ची उड्डाण थांबल्यानंतर आता कंपनीच्या १६,००० कयमस्वरूपी आणि ६,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार लटकली आहे.

५) २६ बँकांचा कर्ज

सध्या तरी जेट एअरवेजवर एकूण २६ बॅंकांचे जवळपास ८,५०० करोड रुपये कर्ज आहे. यात काहीच खासगी तर काहीच प्रदेशाची बँकांचा समावेश आहे. पब्लिक सेक्टर मध्ये केनरा बैंक, बैंक ऑफ इंडिया, सिंडिकेट बैंक, इंडियन ओवरसीज बैंक, इलाहबाद बैंक, एसबीआय आणि पीएनबी बँकांचा समावेश आहे. याशिवाय खासगी बँकांमध्ये आईसीआईसीआई आणि येस बँकांचा समावेश आहे.

६) जेटच्या विक्रीची प्रक्रिया जारी

जेटला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समूहाकडून एसबीआई ने ८ ते १२ एप्रिल दरम्यान जेट एअरवेज ची ३२.१ ते ७५ टक्के भागीदारी विक्रीसाठी बोली लावण्यात आली होती. पुढे बोली सोपवण्यासाठी १० मे पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

७) १९९३ साली सुरु झाली होती वाटचाल

नरेश गोयल यांनी १९९१ मध्ये एअर टॅक्सिच्या रूपात जेट एअरवेज ची सुरुवात केली होती. तेव्हा भारतात खाजगी विमान उड्डाणाची परवानगी नव्हती. एका वर्षानंतर जेटने चार विमानांचा एक बंच तयार केला आणि जेट एयरक्राफ्ट ची पहिले उड्डाण सुरु झाले. ५ मे १९९३ रोजी मुंबई-अहमदाबाद चे पहिले उड्डाण झाले होते.

८) सहारा एअर खरेदीमुळे सुरु झाले संकट

गोयल यांनी २००७ मध्ये सहारा एअर ला १,४५० करोड रुपयांना खरेदी केले होते. गोयल यांनी कंपनीला जेटलाइट असे नाव दिले होते. हे सर्वाधिक किमतीची डील होती. त्यानंतर जेटला उतरती कळा लागली. आणि शेवटी २०,००० रुपयांच्या कर्जात आकंठ बुडाले.

९) नरेश गोयल यांचा राजीनामा

अखेर ज्यांनी ही कंपनी जन्माला घातली त्या नरेश गोयल यांनी २५ मार्च ला जेट च्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांची पत्नी अनिता गोयल ने देखील सदस्यत्व सोडले. जेट चे ५१% शेअर पाहिल्यासारखेच गोयल यांच्याजवळ आहेत. तसेच २४% हिस्सेदारी पार्टनर एतिहाद एयरवेज जवळ आहेत. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ३१.२ टक्के शेअर विकण्याची घोषणा केली होती. आणि यावेळी ते म्हणले होते की उर्वरित हिस्सा देखील ते विकणार आहेत.