७ हजार रुपयाची लाच स्विकारताना महाविद्यालयातील दोन लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनालीईन – सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधीची कागदपत्रे पूर्ण करुन ती मंजूर करुन घेण्यासाठी ७ हजार रुपयाची लाच घेताना गुहागर येथील एका महिविद्यालयातील दोन लिपिकांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) दुपारी पावणे दोनच्या सुमारास महाविद्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ लिपिक उदय वसंत रावणंग (वय ४७) आणि कनिष्ठ लिपिक राजेश महादेव खामकर (वय ४८) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. याप्रकरणी तक्ररारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदाराकडे निवृत्तीवेतन आणि भविष्य निर्वाह निधीची सर्व कागदपत्रे पूर्ण करून ती जिल्हापरिषद शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून दुपारी पावणे दोन वाजता सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रानमाळे, निरीक्षक प्रवीण कदम, संदीप ओगले, संतोष कोळेकर, विशाल नलावडे, श्रेया विचारे, चंद्रकांत कुळ्ये, दिपक आंबेकर यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.