‘सेक्रेड गेम्स’ फेम ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं पुण्यात निधन !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सेक्रेड गेम्स सारख्या फेमस वेब सीरिजमध्ये लक्षवेधी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं पुण्यात निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या नंतर त्यांची पत्नी, दोन मुलं एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे.

धुमाळ यांच्या निधनानं साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.

रामचंद्र धुमाळ यांनी अभिनय क्षेत्रात खूपच उशिरा पाऊल टाकलं होतं. असं असलं तरी त्यांनी अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओखळ तयार केली होती. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं.

धुमाळ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान स्टारर सेक्रेड गेम्स या खूप गाजलेल्या वेब सीरिजणध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांनी फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या, छत्रपती शासन अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. या पैकी सैराट आणि ख्वाडा हे सिनेमे खूप गाजलेले सिनेमे आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like