दोन दिवसात सर्व खड्डे बुजवा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. पावसाळा सुरु झाला असून खड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यावर आज (गुरुवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांच्या दालनासमोर आंदोलन केले. त्यांनतर महापौर नितिन काळजे यांनी तत्काळ संबंधीत अधिकाऱ्यांना बोलावून दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bb8ada0-85dd-11e8-95b2-09bcdc24f52b’]

मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त दालनासमोर ठिया करून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्तांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. हेच का अच्छे दिन म्हणत सत्ताधारी भाजप हाय हाय अश्याही घोषणा दिल्या. शहरातील रस्त्यांवर मोठ्यां प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची चाळण झालेली आहे. खड्यांमध्ये पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आयुक्तांनी तत्काळ हे खड्डे भरून, रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी मनसेने केली आहे.

महापौर नितीन काळजे यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्याकडून सर्व माहिती घेतली. शहरात असणारे सर्व खड्डे दोन दिवसात बुजवून घेण्याचे आदेश दिले. यावेळी चव्हाण यांनी सांगितल्यानुसार शहरात २०१५ खड्डे होते पैकी २६१ खड्डे बुजवण्याचे राहिले आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचा ठेका दिलेली कंपनी दररोज वेगवेगळ्या रस्त्यावरील खड्डे बुजवत आहे. विकास कामासाठी खोदण्यात आलेल्या ठिकाणी पडलेले खड्डे लवकर बुजवले जातील असे त्यांनी सांगितले.