‘कोरोना’नंतर आणखी एक संकट ! अमेरिकेत तब्बल 640 जणांना झाली विचित्र आजाराची लागण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने हाह:कार माजवला असून याचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत झाला आहे. जगभरात या जीवघेण्या आजाराने 1 कोटी 62 लाखापेक्षा जास्त लोकांना संक्रमित केले आहे. यापैकी 43 लाख 15 हजार पेक्षा अधिक रुग्ण हे अमेरिकेतील आहेत. कोरोना व्हायरसने अमेरिकेत आतापर्यंत दीड लाखाच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात अमेरिकेत आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. अमेरिकेतील 11 राज्यांतील 640 पेक्षा अधिक लोकांना सायक्सोस्पोरा नावाचा आजाराची लागण झाली आहे.

हा आजार पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलडमुळे होतो. पॅकेट सॅलडमध्ये आईसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. हे सॅलड खाल्यामुळे तब्बल 641 जणांना विचित्र आजार झाला आहे. यातील 37 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सूक्ष्म परजीवींशी संबंधित हा सायक्लोस्पोरियासिस रोग आहे.

या आजाराची भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी लक्षणं आहेत. ही लक्षण साधारणपणे पॅकेटमधील अन्न किंवा पाणी पिल्यामुळे होतो. याची लक्षणं एका आठवड्यानंतर दिसायला लागतात. ज्या सॅलडमुळे हा आजार पसरला ती उत्पादने इलिनॉयच्या स्ट्रीमवुडमधील फ्रेश एक्सप्रेस कंपनीने उत्पादित केली होती. मे आणि जुलै महिन्यानंतर जवळपास डझनभर राज्यामधून या आजारचे रुग्ण आढळून आली.

अमेरिकेतील आयोवा, जॉर्जिया, इलिनॉय, कॅन्सस, मिसुरी, मिनेसोटा, उत्तर डकोटा, पेनसिल्व्हेनिया, नेब्रास्का आणि विस्कॉन्सिन या ठिकाणी या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. फेडरल अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लोकांनी हे सॅलेड खाऊ नये. कारण सध्या सॅलड उत्पादनांचा शोध सुरु आहे. अन्नाद्वारे जन्मलेल्या इतर आजारांप्रमाणे सायक्सोस्पोरामध्ये डीएनए-फिंगरप्रिंट तंत्रज्ञान नाही ज्यामुळे याचे उत्पादन कोठे करण्यात आले याचा सध्या शोध घेतला जात आहे.