औरंगाबादमध्ये हर्षवर्धन जाधव विरुद्ध चंद्रकांत खैरे ‘सामना’ रंगणार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

शिवसेनेचे  नाराज आमदार हर्षवर्धन जाधव चंद्रकांत खैरेंविरुद्ध  खासदरकीची निवडणूक लढवणार आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर जाधव यांनी नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती.

‘शिवस्वराज्य बहुजन पक्ष’ या नावाने पक्षाला मान्यता मिळावी यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8599cb4-c3ad-11e8-a44f-57c9ed5f1d9a’]

‘शिवस्वराज्य बहुजन पक्ष’ या नव्या पक्षाचा उमेदवार म्हणून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे .शिवसेना आमदार राहिलेले जाधव लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी शिवसेना खासदारांविरोधात रिंगणात उतरणार असल्याने मोठी चुरस निर्माण होणार  आहे. जाधव  यांच्या  घोषणेमुळे खासदरकीची हॅटट्रिक साधणारे चंद्रकांत खैरे यांच्या पुढे  मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

कुख्यात गुन्हेगारांनी पेट्रोल टाकून पेटवले शेजाऱ्याचे घर

[amazon_link asins=’B01N74LA6J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’abee8150-c3bd-11e8-8334-d1cdbd30d492′]
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई असलेले कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नेहमी कोणत्या ना कोणत्या  कारणाने  चर्चेत असतात. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जाधव उपोषणाला बसले होते. सरकारने लवकरात लवकर मागण्या कराव्यात यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यावरून एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर पक्षातून तंबी मिळाल्यावर जाधव यांना माघार घ्यावी लागली होती.त्यामुळे नाराज झालेल्या हर्षवर्धन जाधव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली होती .