बावधनमध्ये एकाच रात्रीत नऊ घरे फोडली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यानी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत (शनिवारी) बावधन परिसरातील नऊ घरांचे कुलूप तोडून सुमारे सात लाख ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. या सर्व चोऱ्या प्रेक्षा सोसायटी आणि इतर चार सोसायट्या मध्ये झाल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c035144-cfc2-11e8-82dc-7978b89c4c24′]

या प्रकरणी चेतन अनिल बर्डे (३८, रा. प्रेक्षा सोसायटी, तपोवन सोसायटीजवळ, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बर्डे, डॉ. अभेया सापटनीकर, संजय पाटील, अशोक प्रकाश पाठक, तसेच रॉयल ट्वीन्स हौसिंग सोसायटीमधील  निलेश फळ, जॉन थॉमस, गुलमोहर सोसायटीमधील निलेश अरविंद देशपांडे, करण दिलीप बावीशी, अनिरुद्ध म्हसे, पद्मश्री  क्लासिक मधील अंकुर सुभाष ओझा, तसेच शिंदे नगर येथे घरफोड्या करण्यात आल्या आहेत.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32df4c34-cfc2-11e8-a9a9-09404c8e80cc’]

चेतन बर्डे यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन सात लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. चोरट्यांनी बर्डे यांच्या सोसायटीमधील इतर फ्लॅटचे लॉक तोडून चोरी केली आहे. तसेच इतरही सोसायटीमध्ये चोऱ्या केल्या आहेत. यामध्येही लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

#MeToo: हाऊसफूल-4 मध्ये नानांच्या जागी ‘या’ दोन अभिनेत्यांची चर्चा 
चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुरुखप बाहेर काढले 

बावधन परिसरात एकाच रात्री नऊ घरफोड्या झाल्याने पोलीस खडबडून जागे झाले आहेत. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले होते. माहिती घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र पतीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.