भद्रावतीत मुक आंदोलन करुन शिवसैनिक व युवा सैनिकांनी वाहिली ‘त्या’ युवतीला श्रद्धांजली

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन  –   उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हातील 19 वर्षीय असहाय्य युवतीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देऊन पीडित युवतीला न्याय द्यावा अशी मागणी भद्रावती येथील शिवसैनिकांनी व युवासैनिकांनी मुक आंदोलन करुन केली.

यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर हर्षल शिंदे , युवासेना जिल्हा समन्वयक तथा नगरसेवक पप्पू सारवान यांच्या नेतृत्वात स्थानिक हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात दि.2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:00 वाजता मुक आंदोलन करीत या घटनेत नराधमांनाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या युवतीला श्रद्धांजली देण्यात आली.अशा वेळोवेळी घडलेल्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावे जेने करून गुन्हेगारांना अशा प्रकारचे दुष्कर्म करण्याचे धाडस होणार नाही.अशी मागणी भद्रावती शिवसेना तथा युवसेना तर्फे मूक आंदोलनात श्रद्धांजली वाहून करण्यात आली.

कार्यक्रमाला युवासेना तालुका अध्यक्ष महेश जीवतोडे , नितीन गेडाम, सुशांत पढाल,जिवन आडेकर,आरिफ पठान,रोशन पेटकर, रोहीत सिडाम, सुरज पेटकर, योगेश काकडे, सौरभ महाजन, मनोज कोसरे, रुपेश देवगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.