१२ वर्षात पुलाचे वाजले १२

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन 

इंग्रजांनी भारतात असताना बांधलेल्या देशभरातील शेकडो पुलांची शंभर वर्षांची गॅरंटी दिली होती. त्या वेळी बांधलेल्या पुलांना आता शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे व ते पुल कालबाह्य झाल्याचे इंग्लंडमधील कंपन्यांनी आता पत्र पाठविल्याचे बातम्या आपण नेहमीच चवीने वाचतो. त्या कंपन्यांचे कौतुकही करतो. त्यानंतर तंत्रज्ञानात खूप बदल झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक मजबूत पुल बांधले जाणे आता सहज शक्य असतानाही आपल्याकडील उड्डाण पुल बांधत असतानाच ते कोसळण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. केवळ १२ वर्षापूर्वी बांधलेल्या भिवंडीतील उड्डाण पुल धोकादायक झाला असून त्याचे स्लॅब कोसळण्यास सुरुवात झाली आहे.

[amazon_link asins=’B077XXRDJM,B07BR3KDDP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7f9f64e-b0cc-11e8-b3f7-cd7724697ab6′]

भिवंडी एस.टी.स्थानकासमोर उड्डाणपुलाखाली बांधलेल्या शौचालयाजवळ बुधवारी सकाळी स्लँब कोसळल्याने परिसरात घबराट पसरली.उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने पुलाखालील रस्त्यावर वहातूक वळविण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने नुकतेच स्ट्रक्चरल आँडीटसाठी शासनाच्या व्हीजेटीआय या संस्थेला पत्र दिले आहे. मात्र त्यापूर्वीच उड्डाणपुलाचा स्लँब कोसळण्यास सुरूवात झाली आहे.

हा उड्डाणपुल धोकादायक झाला असल्याची टिका गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. दहीहंडीसाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा या धोकादायक पुलावरुन गेला होता.

बारामती, दौंड, जेजुरी येथील रेल्वेशी संबंधीत कामे लवकरात लवकर पूर्ण करा