भोसरी मतदार संघात अपक्ष उमेदवाराच्या स्लिप सह पैसे पकडले

तिघांना ताब्यात घेऊन समजपत्र दिले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइ – भोसरी मतदार संघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराच्या स्लिप आणि सोबत पैसे घेऊन जाणाऱ्याना रंगेहाथ पकडून भोसरी पोलिसांच्या स्वाधीन केले. भोसरी पोलिसांनी त्या तिघांना पुढील कायदेशीर चौकशीसाठी हजर राहण्याचे समजपत्र दिले आहे.

या प्रकरणी नंदन अशोक लांडगे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदन लांडगे आणि त्यांचे मित्र मंगळवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास भोसरी सेक्टर क्रमांक 1 मध्ये पोस्टर लावत होते. त्यावेळी त्या ठिकाणी एमएच 14 सीएच 7527 क्रमांकाची स्विफ्ट कार आली. कार मधील दोघांच्या खिसे फूगलेले दिसले. संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली असता गडबड वाटली. त्यामुळे त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली.

निवडून आयोगाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली असता कारमध्ये भोसरीचे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचे चिन्ह असणाऱ्या ‘कपबशी’च्या स्लिप, अनेकांची नावे असणारी यादी मिळाली. तसेच एका पिशवीत 32500 रूपये आढळून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आणि सकाळी चौकशीला हजर राहण्याचे समजपत्र दिले. यादीत नावे असणाऱ्याना बोलावून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी