विचारलं ! ‘पती दुसर्‍या शहरात असताना पेग्नंट कशी झालीस ?’, पत्नीचं उत्तर ऐकून डोक्यालाच हात लावाल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या जगदीशपूर पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेच्या गर्भवती असण्यावर चर्चा सुरु झाली. महिलेची नणंद या प्रकरणी डीआयजीपर्यंत पोहचली. या महिलेचे लग्न 5 वर्षापूर्वी झाले होते. तीला एक दीड वर्षापूर्वी मुलगी झाली. महिलेच्या नणंदेच्या मते आपल्या भाऊ 7 महिन्यांपासून कोलकात्यात असताना तिची वहिनी 3 महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे महिलेच्या नणंदेने शंका उपस्थित केली की असे असताना वहिनी गर्भवती कशी ?

यामुळे नणंद संतापात आहे. ती डीआयजी विकास विभव यांच्याकडे गेली आणि भावाच्या पत्नीची डीएनए टेस्टची मागणी केली. डॉक्टरांच्या तपासात उघड झाले की महिला 3 महिन्याला 12 दिवस कमी आहे.

आता या महिलेच्या पतीने देखील महिलेला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे की मुलं कोणाचे आहे. परंतू महिलेने अजून उत्तर दिले नाही. संपूर्ण कुटूंब आता चिंतेत आहे. यावर महिलेने धमकावले की घरात ठेवाचे असेल तर ठेवा अन्यथा एखाद्या खोट्या प्रकरणात अडकवेल. परंतू या धमकीचा कोणताही परिणाम झाला नाही आणि कुटूंबाने तिला घरात राहण्यास नकार दिला.

हे नाट्य येथेच संपले नाही तर कुटूंबाने महिलेला घरात राहण्यास नकार दिल्यानंतर पंचायत बसवण्यात आली, तेथे महिलेने सांगितले की मुलं तिच्याच पतीचे आहे. महिलेने सांगितले की तिच्या स्वप्नात तिचा पती येत असत आणि त्यामुळे ती गर्भवती राहिली. परंतू यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.

पंचायतीने या दरम्यान महिलेचा फोन तपासला तर महिलेच्या मोबाइलमध्ये एक नंबर मिळाला, जो एका तरुणाचा होता, तेव्हा कळाले की हे मुलं त्या तरुणाचे आहे आणि महिलेचे त्या तरुणाबरोबर संबंध आहे.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like