मुंडन करुन अल्पवयीन मुलीची नग्न धिंड काढली

पाटणा : वृत्तसंस्था

आई-वडील घरी नसताना पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचे मुंडन करून नग्न धिंड काढण्यात आली. या माणूसकीला काळिमा फासणाऱ्या प्रकारामुळे पुन्हा एकदा बिहारचे नाव देशभरात चर्चेत आले आहे. बिहारच्या अरेरिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बिहारमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघतच असून सातत्याने महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडत आहेत.

[amazon_link asins=’B075KK63FC,B0782YGDJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d0d2ed59-b001-11e8-b953-3d73da3061b7′]
येथील अरेरिया जिल्ह्यातील गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडितेच्या शेजाऱ्यांनी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी पूर्ववैमनस्याच्य रागातून हा बदला घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये दोघा नराधमांनी पीडितेचे मुंडन करुन तिची नग्न धिंड काढली. यावेळी पीडितेने आरडाओरड करत कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती आईला दिली. हा धक्कादायक प्रकार समजताच तिच्या आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार केली. पोलिसातील तक्रारीत ६ जणांची नावे आहेत. मोहम्मद रौफ, मोहम्मद अशरफ, मोहम्मद मुन्ना, मोहम्मद शहाब, मोहम्मद अशफाक आणि नहिदा, अशी तक्रारीत नमूद केलेली आरोपींची नावे आहेत. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी मीरा कुमारी यांनी दिली.

वाहन चोर मामाचा भाच्याकडून नागपूरात खून