बिहारमध्ये PM नरेंद्र मोदींच्या प्रचारतोफा 23 पासून धडाडणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या रणधुमाळीत भाजप प्रचाराची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली आहे. येत्या 23 ऑक्‍टोबरपासून ते बिहारमध्ये त्याच्या 12 निवडणूक प्रचारसभा आहेत. पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ही आज माहिती दिली. बिहारमध्ये ता
28 ऑक्‍टोबरपासून तीन टप्प्यांत निवडणुका होत आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण बिहार निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सोडलेले पिल्लू होते. एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वचछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय जतना पक्षावर नुकतीच टीका होती.

गुलाबराव पाटील म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काहीही तथ्य नाही, असे आपण अगोदरपासून सांगत होतो. भाजपने या प्रकरणाचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापर केला आहे. एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर सर्व समोर आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोडलेले ते पिल्लू होते.

हाथरस येथील बलात्कार प्रकरणी भाजपचे नेते एकही शब्द बोलणार नाहीत. दुसरीकडे एक बोट दाखविताना चार बोटे आपल्याकडे असतात, हे आता भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. या आधी कधी आत्महत्या झाल्या नाहीत का? दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, एकाचीही सीबीआय चौकशी झाली नाही. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना राज्यपाल कधी भेटले नाहीत. परंतु कंगना राणावत हिला त्यांनी भेटीची वेळ दिली. हे सर्व राजकारणच होते, हेच आता दिसून आले आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

नरेंद्र मोदींच्या असा आहेत सभा
23 ऑक्‍टोबर- सासाराम, गया व भागलपुर.

28 ऑक्‍टोबर-दरभंगा,मुजफ्फरपूर व पाटणा

एक नोव्हेंबर -छपरा, पूर्व चंपारण्य व समस्तीपूर

तीन नोव्हेंबर- पश्‍चिम चंपारण्य, सहरसा व फ़ारबिसगंज