Exit Poll 2019 : बिहारमध्ये भाजपची सरशी, गुजरातमध्ये जागा घटल्या

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान संपले असून एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार देशताली ५४२ जगांपैकी २८७ जागा एनडीए तर १२८ युपीएला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर इतर १२७ ठिकाणी विजयी होतील. युपी आणि महाराष्ट्रात भाजपाला जगा गमवाव्या लागल्या असल्या तरी बिहारमध्ये भाजप-जेडीयूला सर्वात जास्त जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बिहारमध्ये भाजप-जेडीयूला ३३ जगा मिळतील तर काँग्रेस-आरजेडीला केवळ ७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला ३१ जगा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला-आरजेडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये भाजपा-जेडीयूला दोन जगांचा फायदा होताना दिसत आहे. तर काँग्रेस-आरजेडीची एक जगा कमी होताना दिसत आहे.

गुजरातमध्ये भाजपाला फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या गुजरात राज्यात भाजपाला तीन जागा गमवाव्या लागत आहेत. या ठिकाणी भाजपाला २४ तर युपीएला ५ जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. २०१४ मध्ये भजापने २७ जागा मिळवल्या होत्या. यंदा मात्र तीन जागा कमी होऊन याचा फायदा युपीएला होत आहे. २०१४ मध्ये युपीला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यांना तीन जागांचा फायदे होत आहे.

इतर राज्यातील अंदाज
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची मुसंडी भाजप १६ , काँग्रेस २, तर तृणमूल काँग्रेसला २४ जागा मिळणार.
राज्यस्थान भाजपा – १९ युपीए – ०६