कारच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

यवत (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक विद्यार्थ्यांच्या दुचाकीला बसून आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दीत शनिवारी (दि.१३) दुपारी झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार आयटीआय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यु झाला. हा अपघात शनिवार (दि.१३) रोजी दुपारी घडला होता.

रेल्वे दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

या अपघातात आकाश राजेंद्र अडागळे (वय २१ वर्षे रा. नानगाव, ता. दौंड) असे मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या अपघाताची अधिक माहिती अशी आहे की, मयत आकाश अडागळे व त्याचा मित्र निखिल दामोधरे हे वरवंड येथे आयटीआय मध्ये शिकत आहेत. शनिवारी दुपारी हे दोघे  आपली दुचाकी क्रमांक (एमएच ४२ डब्ल्यू ७९६२) वरून महामार्गावरून वरवंड बाजूकडून चौफुला बाजूकडे आकाश अडागळे व त्याचा मित्र निखिल दामोधरे येत होते. याच वेळी पाठीमागून आलेली मोटार क्रमांक ( एमएच ५० एल १८४१) वरील चालकाने या दुचाकीस जोराची धडक दिली.

चार वर्ष सत्तेत आहात मग राममंदीर का नाही झाले – राष्ट्रवादी नेते

यावेळी या अपघातात आकाश गंभीर जखमी झाला. आकाश यास पुढील उपचारासाठी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील रूग्णालयात  दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान आकाश अडागळे या विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला. आकाश याचे वडील राजेंद्र तुकाराम अडागळे यांनी मोटार चालका विरोधात आज शुक्रवार रोजी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून यवत पोलिसांनी मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.