भिंत पडून बालकाच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदार, सुपरवायझर विरुद्ध गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कासारवाडी येथे ड्रेनेजचे काम करताना भिंत कोसळून बालकाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदार आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सनोज महिंद्रा ठाकूर (३२, रा. कासारवाडी) याने फिर्याद दिली आहे. तर ठेकेदार संतोष हन्नु राठोड (रा. मोहननगर, चिंचवड), सुपरवायझर यशोधर गावित (रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील यशवंत सोसायटीजवळ ड्रेनेजचे काम सुरू होते. हे काम मागील दीड महिन्यापासून सुरू होते. यासाठी कामगारांनी खोलवर खोदकाम केले होते.

यादरम्यान शेजारी असलेल्या सोसायटीच्या संरक्षक भिंतीसाठी ठेकेदाराकडून कोणतीही संरक्षक उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

You might also like