प्रशिक्षणार्थी ४३ पोलीस उपनिरीक्षक पिंपरी चिंचवड आयुक्तालयात हजर

पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाईन

खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ‘बॅच’ मधील ४३ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आज नव्याने सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हजर झाले आहेत. यामुळे काही प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे. दोन दिवसांपूर्वी ६६९ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ६६९ पैकी पुणे पोलीस आयुक्तालयात १३ तर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात ४३ उपनिरीक्षक देण्यात आले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e26f0b7f-cc53-11e8-a06a-cd4397e48ea9′]

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज बुधवारी सकाळी हजर झालेले नवनियुक्त  पोलीस उपनिरीक्षक पुढीलप्रमाणे : गोविंद लक्ष्मण चव्हाण, किरण सदाशिव कणसे, संदीप शांताराम गांधीलकर, महेंद्र बाळासाहेब गांधले, गणेश नारायण गायकवाड, अमरदीप कृष्णा पुजारी, गणेश नारायण आटवे, मैनीनाथ ज्ञानेश्वर वरुडे, अनिरुद्ध महादेव सरवदे, अशोक भागवत तरंगे, चंद्रकांत गंगाधर जवळगी, शंभू गोरक्षणनाथ रनावरे, राजेश भारत मोरे, रविंद्र सुखदेव मुंडल,  रुपेश अशोक साबळे, यशवंत ज्ञानेश्वर साळुंखे, मकसूद किरण मणेर, इम्रान बाबाजी मुल्ला, प्रितेश शामराव पाटील, सचिन पंडीत देशमुख, संतोष सुग्रीव डोलारे, अशोक बाळू जगताप, सागर बबन बामणे, अमोल रमेश डेरे, रोहीत राजेंद्र दिवटे, सोमनाथ सुरेश झेंडे, अमोल श्रीरंग कामठे, अशोक नानाभाऊ कोकाटे, नामदेव रंगराव अंगज, संदेश संभाजी इंगळे, ज्ञानेश्वर यल्लू धनगर, जितेंद्र सुरेश गिरनार, विवेक विनायक कुमठकर, गोविंद युवराज पवार, सचिन अरुण चव्हाण, संतोष हरिभाऊ येदे, ज्ञानेश्वर काशिनाथ दळवी, संतोष सर्जेराव गांधले, भाऊ पोपट दुबे, दस्तगीर हसन तांबोळी, दत्तात्रय जयसिंग नागरगोजे, ज्ञानेश्वर सुभाष कोकाटे, उत्तम भाऊसाहेब ओमासे.

गृह राज्यमंत्री केसरकरांविरोधात सामुहिक बलात्कारातील पीडित महिलांची तक्रार

प्रशिक्षणार्थी ४३ पोलीस उपनिरीक्षक हजर झाल्याने आयुक्तालयासाठी जाणवत असणारा मनुष्यबळाचा थोडासा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या नव्याने उपनिरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच केल्या जाणार आहेत.

[amazon_link asins=’B0757K3MSX,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbced977-cc54-11e8-91da-35a2b5248ce6′]