चिंचवड मतदार संघात महायुतीत बंडखोरी, भाजपच्या लक्ष्मण जगताप विरुध्द शिवसेनेचे राहुल कलाटे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या विरुध्द शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात खरी लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कलाटे यांना पुरुस्कृत करण्याची दाट शक्यता आहे.

चिंचवड मतदार संघात 2014 च्या विधानसभेला भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यात लढत झाली होती. मोदी लाट असताना देखील कलाटे यांनी दुस-या क्रमांकाची म्हणजेच 63 हजार 489 मते घेतली होती. यावेळी शिवसेना-भाजपची महायुती आहे. पण, राहुल कलाटे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा जगताप आणि कलाटे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कलाटे यांना मदत करण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश घोडके, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले यांच्यासह सुरज खंडारे, डॉ. मिलिंदराजे भोसले, राजेंद्र काटे, रवींद्र पारधे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर कैलास परदेशी, जावेद शेख, धर्मपाल तंतरपाळे यांनी माघार घेतली आहे. जगताप आणि कलाटे यांच्यातच खरी लढत होणार आहे.

Visit : Policenama.com