‘कोरोना’ने बदलल्या लोकांच्या गरजा ! आता क्रीम-पावडर-तेल नव्हे तर लोक खरेदी करताहेत ‘हे’ सामान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारी त्या कंपन्यांसाठी पैसे कमावण्याची मोठी संधी बनली आहे, ज्या पॅक केलेल्या वस्तूंचा व्यवसाय करतात. यावेळी या कंपन्या नवीन उत्पादने आणत आहेत ज्यांचा दावा आहे की, त्या तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतील. एप्रिल ते ऑगस्ट या काळात या कंपन्यांनी डझनभर नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये भाजीपाला आणि फळ धुण्याचे वॉश तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे ज्यूस आणि हळद दूध आणि आइस्क्रीम यांचा समावेश आहे. ग्राहकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती बूस्टर उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्यांना स्किन केअर आणि होम केअर यासारख्या श्रेणीच्या विक्रीत झालेल्या मोठ्या घसरणीची भरपाई करण्याची संधी मिळाली आहे.

हळदी उत्पादनांच्या लाँचमध्ये वेग
विप्रो कंझ्युमर केअर अँड लायटिंगचे अध्यक्ष म्हणाले की, एप्रिल २०२० पासून आमच्यासाठी नवीन उत्पादने खूप महत्त्वाची आहेत. या दरम्यान कंपनीने साबण, हँडवॉश, सॅनिटायझर्स, जंतुनाशक, अँटी-जर्म डिटर्जंट्स आणि फॅब्रिक कंडिशनर बाजारात आणले आहेत.

हळदीशी संबंधित उत्पादनांना मोठी मागणी
आयुष मंत्रालयाने हळदीसंदर्भात दिलेल्या सल्ल्यामुळेही त्याच्या संबंधित उत्पादनांच्या लॉन्चिंगलाही वेग आला. अमूलने हळदी आईस्क्रीम आणि हळदीचे दूध लॉन्च केले. डाबरचे सीईओ मोहित मल्होत्रा म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आम्ही तीन महिन्यांत ४० हून अधिक नवीन उत्पादने बाजारात आणली. त्याचप्रमाणे मॅरिको ने हनी, टर्मरिक मिल्क मिक्स आणि हळद-आले दूध बाजारात आणले आहे.

आयटीसीने ५ महिन्यात ४० नवीन उत्पादन लाँच केली
पॅकेज्ड फूड क्षेत्रातील देशातील तिसरी सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी आयटीसीने गेल्या ५ महिन्यांत ४० नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये भाज्या आणि फरशी साफसफाईची उत्पादने आणि इम्युनिटी बेव्हरेज यांचा समावेश आहे. मागील वर्षी कंपनीने एकूण ६० नवीन उत्पादने बाजारात आणली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like