In Corona Mask Is Must : ‘कोरोना’च्या काळात मास्क गरजेचंच !

पुणे – व्हॅक्सिन येईपर्यंत कोरोनावरची सर्वोत्तम लस म्हणजे मास्क. . कोरोनाची ही लढाई आता ‘करो या मरो’ या टप्प्यात पोहचलीय. पण तरीही आपला समाज या स्थितीला गांभिर्यानं घेत नाही. सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत चाललीय. लोकांना मास्क तोडांला लावायचा विसर पडतोय. याचाच परिणाम म्हणजे रोजच्या रोज वाढत जाणारा आकडा आणि त्याखाली लपलेले-दिसलेले लाखो लोकांचे मृत्यू.

 

 

 

 

 

तेव्हा हे चित्र बदलायचं असेल आणि कोरोनाची लढाई जिंकायची असेल तर समाजामध्ये जागृती करुन लोकांना मास्क घालण्यासाठी प्रवृत्त केलं पाहीजे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी, माध्यम क्षेत्रातील दिग्गज, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार, सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर, राजकीय नेते आणि महाराष्ट्रातील लाखो तरुण एकत्र येउन आम्ही ‘Mask Is Must’ हे कँपेन राबवतोय. लोकांनी मास्कचा वापर करावा त्यासाठी जे काही करता येणं शक्य आहे ते सर्व या कँम्पेनमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

तेव्हा हे आमचे प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी मास्कसह तुमचा सेल्फी काढून ‘Mask Is Must’ या टॅगसह फेसबुक-इन्स्टाग्रामवर अपलोड करा. मास्क वापरा आणि इतरांनाही वापरायला प्रवृत्त करा.