कोरोना काळात मदतीच्या नावाखाली होतीये फसवणूक? तर इथं करा तक्रार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना व्हायरसचा थैमान सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्ण हजारोंच्या संख्येने वाढत आहेत. त्यामध्ये अनेकांना मदतीची गरज भासतेच. पण त्याच माध्यमातून अनेकांची फसवणूकही झाली असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, तुम्ही यापासून वाचणे महत्वाचे आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामध्ये कोरोनासंबंधी औषधे, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर बेड्स, लसींच्या आमिषाने अनेक फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. मात्र, तुमचीही अशाप्रकारे फसवणूक झाली असेल तर तुम्ही तक्रार करणे गरजेचे आहे.

कोरोनासंबंधी कोणतीही फसवणूक झाल्यास इथं करा तक्रार 

– दिल्ली पोलिसांनी अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी एक सर्व्हिस केली सुरू

– ऑनलाईन रिपोर्ट करू शकतात. त्यासाठी 011-23469900 या क्रमांकावर करा कॉल

– ऑनलाईन पेमेंट केले असेल तर त्यासाठी #155260 वर करा रिपोर्ट

– http://cybercrime.gov.in वरही रिपोर्ट करू शकता.

एकदा पेमेंट झाल्यानंतर…

फसवणूक करणारे लोक गरजूंना ऑक्सिजन पुरवठा, हॉस्पिटल बेड्स, रेमडेसिव्हिरच्या नावाने फसवणूक करतात. मदतीच्या आशेने गरजू अशा फसवणूक करणाऱ्यांना पेमेंट करतात. मात्र, एकदा पेमेंट झाल्यानंतर त्यांना कोणत्याच प्रकारची मदत मिळत नाही. फसवणूक करणारे सोशल मीडिया साईट्स ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुकची मदत घेत आहेत.