दौंडमध्ये एकाच कुटुंबातील 13 जणांना ‘कोरोना’ची बाधा

दौंड ( अब्बास शेख) : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाने आपले जाळे पसरवायला सुरुवात केली असून आता त्याने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील महत्वाचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या दौंड तालुक्यामध्येही कोरोनाने आपले जाळे वाढवायला सुरुवात केली आहे. दौंड शहरामध्येच एकाच कुटुंबातील तब्बल 13 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये पाच लहान आणि एका वयस्क महिलेचा समावेश आहे.

अगोदर या कुटुंबातील 7 जण कोरोना बाधित झाले होते नंतर आता पुन्हा त्यामध्ये 6 ने वाढ होऊन कुटुंबातील एकूण कोरोना बाधितांची संख्या तेरा झाली आहे. कोरोना बाधित झालेले कुटुंब हे दौंड शहरात दूध विक्री करणाऱ्या इसमाचे असून अगोदर या कुटुंबातील एका वयस्क व्यक्तीस चार दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या 6 नातेवाईकांना बाधा झाली.

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील अन्य लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल आज शनिवार दि 13 जून रोजी आला आहे. या अहवालामध्ये सहा जणांना बाधा झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्या कुटुंबातील एकूण बधितांची संख्या ही 13 झाली आहे. त्यामुळे सध्या नुसत्या दौंड शहरातील कोरोना इफेक्ट झालेल्यांची संख्या 25 असून त्यामध्ये SRPF 8 जवान आणि 17 इतर स्थानिक रहिवास्यांचा समावेश आहे.