डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार : संजय राऊत

नवी दिल्ल्ली वृत्तसंस्था – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. काल दिल्लीमध्ये आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली यावेळी सर्वांनी सकारात्मकता दाखवल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत शिवसेनेना सरकार स्थापन करेल. दिल्लीत झालेल्या बैठकीत समान कार्यक्रमावर चर्चा झाली असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

काल आघाडीच्या नेत्यांची बैठक खूप उशिरा पर्यंत चालली त्यामुळे आज शरद पवारांची भेट घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादीला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद, यावर चर्चा नाही
पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसलाही अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे का ? असे पत्रकारांनी विचारले असता, अशा पराकारच्या कोणत्याही मुद्द्यावर अद्याप तरी चर्चा झालेली नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आघाडीतील प्रत्येक नेत्या सोबत फोनवरून देखील चर्चा झाली आहे तसेच आघाडी सोबत लवकरच मुंबईत शिवसेना मिटिंग करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राज्यात सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता भाजपच्या इच्छांना सुरुंग लागून राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com