New Traffic Rules : वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडले तर होईल मोठा दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अपघाताच्या घटना नित्याच्या बनत चालल्या आहेत. भरधाव वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम (New Traffic Rules) न पाळणे या गोष्टी अपघाताचे मुख्य कारण बनत आहे. वाहतूक सुरक्षेबाबत चांगले नियम आहेत, पण ते पाळले जात नाहीत हेच दुर्दैव आहे. पण आता वाहतुकीच्या नियमांचे (New Traffic Rules ) उल्लंघन करणं चांगलेच महागात पडणार आहे. कार आणि दुचाकीचे नियम बदलले आहेत. यामुळे नियम मोडल्यास वाहनचालाकांना मोठा दंड भरावा लागणार आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये (Delhi) दिल्ली सरकारनं कार आणि मोटारसायकल चालकांसाठी वाहतुकीचे नवीन नियम (New Traffic Rules) लागू केले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्या 500 रुपयांपासून ते हजार रुपयापर्यंत दंड (Fine) भरावा लागणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण, वाहतूक कोंडी या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं हे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत नवीन नियम ?

नव्या नियमानुसार कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या व्यक्तीलाही सीट बेल्ट (Seat Belt) लावणे बंधनकारक आहे. मागे बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नाही तर दंड भरावा लागणार आहे. तर दुचाकीला (Bike) साईड मिरर (Side Mirror) असणे बंधनकारक आहे. साईड मिरर नसतील तर वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हे दोन्ही नियम मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट 1988 (Motor Vehicle Act 1988) आणि सेन्ट्रल मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट 1989 (Central Motor Vehicle Act 1989) मध्ये पूर्वीपासून आहेत, मात्र आता ते पुन्हा लागू करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने देखील वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करुन नवीन नियम लागू केले आहेत. नव्या मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दुप्पट ते पाचपट दंडाची रक्कम वसूल करण्याची तरतूद या नव्या नियमांमध्ये करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्राने वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर अधिक रकमेचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.