नियमांचा बडगा उगणाऱ्या कडुनच नियमांची पायमल्ली ! पोलीस अधिक्षक कारवाई करणार ?

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात वाहतुक नियमांचे नेहमीच उल्लघंन केले जाते. काही दिवसांपुर्वी फक्त सप्ताह निमित्त पोलीस अधिक्षकांनी केलेल्या आदेशानुसार दंडात्मक टामटुम कारवाई करण्यात आली. परंतू शहरात वाहतुक नियमाला केराची टोपलीच दाखविली जाते.

शहरातील मुख्य मार्ग,चौकातील सिग्नल बंदच आहे.चौकात नेहमीच वाहतुक कोंडी,वाहने रस्त्यावरच पार्कींग केलेली असतात. वाहतुकीला शिस्त हि थोड्या प्रमाणात पोलीस अधिक्षक अब्दुल रहमान व अखिलेश सिंग,वाहतुक शाखेत कार्यरत असलेले निरीक्षक वासुदेव देसले, यांनी लावली होती.

सध्या वाहतुकीचे तिन तेरा झालेले चिञ शहरात सर्वञ दिसत आहे.पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचे वाहनांवर पोलीस लोगो चिटकवलेला, मोठे नाव, मिलट्रीचे चिन्ह नंबर प्लेटवर लावलेले असते. अण्णा, नाना, चिञ, विचिञ नावे असतात. नंबर नसतो. विना नंबर प्लेट,कर्कश हॉन,फँन्सी प्लेट अशा दुचाकी कार्यालयात उभ्या दिसतात यावर कारवाई होत नाही. धुम स्टाईलने कॉलेज बॉय सुध्दा बिना नंबर प्लेटच्या दुचाकी मिरवताना दिसतात. नियमाचे नेहमी बडगा उगारणारे नियमांचे जर तिन तेरा करणार तर सामान्य नागरीकांवर नियमांचा बडगा का असा सवाल नागरीक करत आहे.

आज जिल्हा न्यायालयाचे आवारात पोलीस कर्मचारी यांचे वाहन पार्किंग केलेले होते. बुलेट काळ्या रंगाची होती. तिचे पुढील नंबर प्लेटवर इंग्रजीत पोलीस असे ढळक अक्षरात लिहिलेले आहे. पाठिमागील नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची कोरीच आहे.तिच्यावर नंबरच लिहिलेला नाही. वाहतुक नियम पाळायचे तर ते सगळ्यांनीच सारखे परंतु जे रक्षण करतात तेच गैर वर्तन करतील तर मग सामान्य नागरीकांना नेहमी ञास का दिला जातो. असा सवाल नागरीकांनी हे पार्कींग केलेले दुचाकी वाहन पाहुन उपस्थित केला. काही वकीलांनी ह्या दुचाकी मोबाईलचा फोटो भ्रमणध्वनीत कैद करुन शहरातील साऱ्या भ्रमणध्वनीवर पाहता येईल या करीता पटापट व्हॉटसअप द्वारे शेअर केला. आता साऱ्यांचे लक्ष लागुन आहे. की जिल्हा पोलीस अधिक्षक काय कारवाई करतात.

Visit : Policenama.com