आतंकवाद्यांना मदत करणार्‍या DSP दविंदर सिंहांविरूध्द IB ला मिळाले खळबळजनक पुरावे, ‘या’ पत्रामुळं होऊ शकतो मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या डीएसपी दविंदर सिंह प्रकरणात केंद्रीय गुप्तचर संस्थेने एक महत्वाची माहिती उघड केली आहे. दविंदरची पत्र 2005 साली ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित दिसून येत आहेत. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनुसार 2005 मध्ये दिल्ली पोलिसांनी 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. या आरोपींकडून एके-47 आणि मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती. याशिवाय तपास यंत्रणांना एक चिठ्ठी देखील मिळाली जी दविंदर सिंहने लिहिली होती.

काय होते चिठ्ठीत –
या अटक करण्यात आलेल्या लोकांवर दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल मुजाहिद्दिनसाठी काम करण्याचा आरोप लावला होता. यातील एका संशयित आरोपीचे नाव गुलाम मोइनुद्दीन डार उर्फ जाहीद असे आहे. त्याच्याकडून काही दस्तावेज जप्त करण्यात आली जी दविंदर सिंहने दिली होती. हे महत्वाचे दस्तावेज डीएसपी दविंदर सिंहने आपल्या लेटर हेडवर हस्ताक्षरासह दिली होती. या दस्तावेजमध्ये लिहिले होते गुलाम मोइनुद्दीन पुलवामामध्ये राहणार आहे. तो त्यांच्याकडे कायम एक पिस्तुल आणि एक वायरलेस सेट ठेवतो यामुळे सर्व दलांना विनंती आहे की कोणत्याही चौकशीशिवाय त्याला जाऊ द्यावे, त्याला अडवले जाऊ नये.

तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार गुलाम मोइनुद्दीन याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गटाने त्यावेळी दविंदर सिंहशी चर्चा केली होती आणि त्यासंबंधित माहिती मागितली होती. तेव्हा दविंदर सिंहने फोन करुन ते पत्र सत्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या दस्तावेजाच्या आधारे न्यायालयाने आरोपीला मुक्त केले होते.

कुठे झाली चूक –
प्रश्न उपस्थित होत आहे की अखेर दविंदर सिंह एखाद्या सामान्य व्यक्तीला वायरलेस सेट घेऊन जाण्यास परवानगी कसा देऊ शकतो. शस्त्र आणि वायरलेस सेटशिवाय कोणत्याही तपासणीशिवाय संशयित तरुणाला घेऊन जाण्याचा परवानगी कशी देण्यात आली. सूत्रांच्या मते 2005 मध्ये जम्मू काश्मीर पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी हे गंभीर्याने घेतले असते तर आज दविंदर सिंह याच्यामुळे पोलीस आणि संस्थांची इतकी बदनामी झाली नसती.

आता होणार चौकशी –
एनआयएच्या सूत्रांना जेव्हा या पत्राबाबत विचारण्यात आले तेव्हा सांगण्यात आले की या प्रकरणाचे गांभीर्य पाहता दविंदर सिंहला दिल्ली मुख्यालयात चौकशीसाठी आणले जाईल, या प्रकरणाची विस्ताराने चौकशी होईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/