विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळांना २ ढोल पथकांनाच परवानगी

पुणे : पोलीसनामा 

गणेशप्रतिष्ठापनेसाठी शहरात दिवसभर निघालेल्या मिरवणुकींमध्ये ढोल ताशा पथकांनी रस्त्यावर जागोजागी थांबून बराच वेळ केलेल्या वादनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था अनेकदा कोलमडून पडली होती. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूकीत प्रत्येक गणेश मंडळापुढे असणाऱ्या ढोल पथक व त्यांच्या संख्येवर पोलिसांनी मर्यादा आणली आहे. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी थांबून बऱ्याच वेळ वादनाचे आवर्तन करण्यास ही निर्बंध आणण्यात आले आहेत. तीन चौकात थांबून वादन करण्यास परवानगी दिली आहे. तसेच एका मंडळापुढे एकाच ढोल ताशा पथकाला परवानगी देण्यात आली आहे.

एका ढोल ताशा पथकात  ४० ढोल, १० ताशा व ६ झांज एवढ्याच वाद्यांचा समावेश असेल. एका ढोल पथकामध्ये वादक, सुरक्षा कडे करणारे असे सर्व मिळून जास्तीत जास्त शंभर सदस्यांचा समावेश करावा. एका गणेश मंडळाबरोबरील ढोल पथक सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच ढोल पथकाला परवानगी राहील. मानाचा गणपतीपुढे ३ ढोल पथके तर इतर गणेश मंडळांपुढे २ ढोल पथकांना परवानगी राहणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपतींची मिरवणूकीने प्रतिष्ठापना

पोलिसांनी यंदा फक्त तीन चौकत थांबून वादनाला परवानगी दिली आहे. प्रत्येक ढोल ताशा पथकाला लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुकीत फक्त बेलबाग चौक, उंबऱ्या गणपती चौक व अलका टॉकीज चौक या तीन चौकांमध्येच जास्तीत जास्त २० मिनिटाचे वादन आवर्तन करता येईल. या व्यतिरिक्त कोणत्याही चौकामध्ये किंवा रस्त्यावर थांबून आवर्तन करता येणार नाही. तसेच या तीन चौकातही २० मिनिटांपेक्षा अधिक काळ वादन करता येणार नाही.

[amazon_link asins=’B00TPBPRVC,B01IFR8Z10′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb1ccc01-b7d1-11e8-a529-b3458e05b502′]

टिळक रोडवरील मिरवणुकीत पुुरम चौक व एस. पी. कॉलेज चौक, केळकर रोडवर टकले हवेली चौक व अलका टॉकीज चौक, कुमठेकर रोडवर अलका टॉकीज चौकात थांबून वादन करता येईल. विसर्जन मिरवणुकीत एका ढोल ताशा पथकाला फक्त एकाच गणेश मंडळासोबत विसर्जन मिरवणुकीत सहभागी होता येईल सहभागी झालेल्या गणेश मंडळाचे विसर्जन झाल्यानंतर त्या मंडळासोबत असलेल्या ढोल ताशा पथकाला पुन्हा नव्याने दुसऱ्या गणेश मंडळासोबत सहभागी होता येणार नाही.

ढोल ताशा पथक मिरवणुक वेळेपूर्वी पोहचले नाही या कारणावरुन कोणत्याही गणेश मंडळांना मिरवणुक थांबविता येणार नाही. त्याचबरोबर शहरातील इतर मार्गांवरही ढोल ताशा पथकांनी जास्तीत जास्त २० मिनिटे वादन करणे अपेक्षित आहे.

लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर प्रत्येक ढोल ताशा पथक हे जास्तीत जास्त २ तास राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुक लवकर संपविणे शक्य होणार आहे. पुणे शहर पोलीस दलाचे सह आयुक्त शिवाजी बोडखे यांनी आज हा आदेश काढला असून त्याचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले आहे.