निवडणूक प्रशिक्षणातच दारुड्या कर्मचाऱ्याचा राडा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण सुरु असताना तळीराम कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत राडा घातला. त्यामुळे प्रशिक्षणात व्यत्यत आला. नेवासा शहरातील ज्ञानोदय हायस्कूल येथे आज ही घटना घडली. तो कर्मचारी पाटबंधारे विभागात नोकरीला आहे.

नंदकिशोर भीमराज नाबदे (रा.शिरसगाव, ता. नेवासा) हे तळीराम कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नेवासा शहरात दोन ठिकाणी कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सकाळी ज्ञानोदय हायस्कूल येथे प्रशिक्षण आयोजित केले होते. सकाळी दहाच्या सुमारास प्रशिक्षणसाठी आलेला कर्मचारी नंदकिशोर

नाबदे हा प्रशिक्षण सुरू असताना दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत गोंधळ घालू लागला. नाबदे यांच्या गोंधळामुळे प्रशिक्षणात अडचण निर्माण झाली. त्यामुळे काही काळ प्रशिक्षण थांबले. तहसीलदार रूपेश सुराणा यांनी पोलिसांना बोलावून तळीराम नाबदे याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस उपनिरीक्षक भारत दाते यांच्यासह आलेल्या पोलीस कर्मचारी तुळशीराम गीते, प्रीतम मोढवे व पोटे यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com