4 वर्षात 2000 च्या 33 कोटींपेक्षा जास्त बनावट नोटा ताब्यात, जाणून घ्या कोणत्या राज्यात बनावट नोटांचा ट्रेंड अधिक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बनावट नोटांचे चलन भारतात नवीन नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात झालेल्या नोटबंदीनंतर असे दिसत होते की, आता बनावट नोटांचे फसवे व्यापार रोखले जातील. मात्र, तसे झाले नाही अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सुरू आहेत. ग्वाल्हेर एसटीएफने एका दिवसापूर्वी दोन हजारांच्या अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटांसह काही लोकांना अटक केली. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या अहवालात देशभरात पकडल्या गेलेल्या बनावट नोटांचा डेटा नोटाबंदीनंतर देण्यात आला आहे. त्यामध्ये 200, 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटांचा नमुना आहे, जो एका विशिष्ट राज्यात अधिक दिसून येतो. जाणून घेेेऊया सविस्तर..

चार वर्षांपासून आतापर्यंत पकडल्या गेल्या इतक्या नोटा

गृहविभागाच्या अहवालानुसार, नोटाबंदीनंतर 2 हजारांव्यतिरिक्त 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटांची चर्चा केली तर चार वर्षांत वेगवेगळ्या राज्यातून एकूण 33 कोटी 21 लाख रुपये जप्त करण्यात आले. या नोटा चलन दरम्यान पकडल्या गेल्या. परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आजही बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचे चलन सुरू आहे. नोटाबंदी झाल्यापासून सर्वाधिक बनावट नोटा विशेषतः 2 हजारांच्या गुजरात मधून पकडण्यात आल्या. चार वर्षात जेेेथे देशभरातून 13 लाख 46 हजार बनावट नोटा पकडण्यात आल्या, यामध्ये 11 कोटी 42 लाख 8 हजार बनावट नोटा एकट्या गुजरातमधून पकडण्यात आल्या, संपूर्ण देशातील दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या सुमारे 40 टक्के.

500 च्या नोटांमध्ये पश्चिम बंगाल दुसर्‍या क्रमांकावर

केवळ एक हजार रुपयांच्या बाबतीतच नव्हे तर 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रकरणात गुजरात इतर सर्व राज्यांना मागे ठेवत आहे. डिसेंबर 2016 ते 2019 या काळात येथे 500 रुपयांच्या बनावट नोटा देखील पकडण्यात आल्या, ज्यांची किंमत 74 लाख 38 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणातील दुसरा क्रमांक पश्चिम बंगालचा आहे, तेथून 46 लाख 9 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

पंजाबमध्ये 200 च्या बनावट नोटा अधिक
गेल्या चार वर्षांत संपूर्ण देशात गृह मंत्रालयाच्या बनावट नोटांच्या अहवालात असेही समोर आले आहे की, 200 च्या बनावट नोटा पंजाबमध्ये सर्वाधिक दिसून आल्या. गेल्या चार वर्षांत पंजाबमध्ये 79 लाख 8 हजार 400 रूपये किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. दरम्यान, येथेही गुजरात फारसे मागे नाही. येथून 77 लाख 6 हजार 800 रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या.