अंत्ययात्रेला आलेल्या तीन युवकांचा तलावात बुडून मृत्यू

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन

जांब येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीला आलेल्या तीन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विशाल सुरेशराव सावळकर, लक्ष्मण दिगंबर कौठकर, दत्ता विठ्ठल दैवज्ञ अशी बुडून मरण पावलेल्या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d60a648b-c3a7-11e8-be40-3d8fbced4291′]

जांब बू. येथील कोंडाबाई तुकाराम पोद्दार यांचा वृद्धापकालाने मृत्यू झाला होता. त्यांचा अंत्यविधी करण्यात झाला. त्यांच्या अंत्यविधिसाठी विशाल सुरेशराव  सावळकर (३२ रा. आरळी ता.बिलोली, जि.नांदेड), लक्ष्मण दिगंबर  कौठकर (३४, रा. होटल ता. देगलूर) आणि  दत्ता विठ्ठल दैवज्ञ (१८, रा.जांब, ता. मुखेड) हे तीन युवक अंत्यविधि आटोपून  जांब येथील तलावात स्नान करण्यासाठी गेले. मात्र, तलावात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिनही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून रितसर पंचनामा करण्यात आला.

[amazon_link asins=’B078BNQ313,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e47be6e6-c3a7-11e8-8fe8-014aab658ea3′]

तलवार, पिस्तुलाचा धाक दाखवून दोघांना लुटले,  १ लाखाचा मुद्देमाल लंपास

 
पिस्तुलाचा आणि तलवारीचा धाक दाखवत अज्ञात भामट्यांनी दोन तरुणांना लुटल्याची घटना नांदेड शहरातील गोवर्धनघाट स्मशानभूमीजवळ रात्रीच्या सुमारास घडली. लूटमार करणाऱ्यांनी दोघांच्या गळ्यातील चैन आणि रोख रक्कम असा १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

आधारलिंकचा बळी :  रेशनचे धान्य न मिळाल्याने भुकेने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

शहरातील वाजीराबद परिसरात राहणारे बवनसिंग भाटिया आणि त्याचा मित्र ऋषीकेश वैद्य हे दोघेही गोदावरी नदी परिसतील गोवर्धनघाट या ठिकाणी बसून गप्पा मारत होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या. त्यापैकी एकाकडे  तलवार तर दुसऱ्याकडे पिस्तूल होते. ऋषीकेश वैद्य यांच्या पोटावर तलवारीने वार करून त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन एकाने हिसकावून घेतली. तर दुसऱ्याने बवनसिंग भाटिया यांच्यावर पिस्तुल रोखून रोख रक्कम काढून घेतली. जवळपास १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन चोरटे पळून गेले. या घटनेनंतर परिसरातील दहशतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध नांदेड शहरातील वाजीराबद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक किरण पठारे करीत आहेत.