भविष्यात तुमच्या मधील ही एखादा पंतप्रधान होईल : आदित्य ठाकरे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

अनेक तरुणांना नोक-या हव्यात तर अनेकांना स्वयंरोजगार उभारायचे आहे. मात्र, तुम्ही कोणतेही काम आवडीने करा त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्याच बरोबर मी तुमच्या सोबतच आहे. तुमच्यासाठीच लढतोय, झगडतोय. फक्त तुम्ही जिद्द सोडू नका. भविष्यात तुमच्यामधील अनेक तरुण विविध पदावर काम देखील करतील. यात एखादा जिद्दीच्या जोरावर देशाचा पंतप्रधानही होईल अशा शब्दात शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात आयोजित रोजगार मेळाव्यात तरुण वर्गाला मार्गदर्शन करताना म्हणाले. तर तरुण वर्गाने जिद्द सोडू नका असे आवाहन देखील त्यांनी केले.

पुण्यातील उरुळी देवाची येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.या कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री विजय शिवतरे, पुणे महानगरपालिकेतील गटनेते संजय भोसले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की,राज्यात तरुण वर्गा समोरील रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला  असून आपण जे शिकतो ते आपल्याला नोकरी मिळवून देवू शकते की नाही. हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील उद्योग आणि शिक्षण विभाग एकत्रितरित्या एज्युकेशन रिफार्म करता येईल का हे पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.