Google IO 2021 : Android 12 सादर करण्यात आले, जाणून घ्या त्याचे खास फिचर्स

नवी दिल्ली : गुगल डेव्हलपर कॉन्फरंस आय/ओ 2021 ची सुरूवात 18 मेपासून झाली. ती 20 मेपर्यंत चालेल. यामध्ये गुगलने अनेक नवीन आगामी फिचर्स आणि अँड्रॉईड 12 बाबत सांगितले आहे.

अँड्रॉईड 12 मध्ये यूजर्सच्या प्रायव्हसीवर लक्ष दिले आहे. गुगलने म्हटले आहे की, प्रायव्हसी फिचर यूजर्सचा डेटा चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवेल. मागच्या वर्षी गुगलने अँड्रॉईड 11 सोबत नवीन प्रायव्हसी सेटिंग लाँच केली होती. यामध्ये अ‍ॅप्सला बॅकग्राऊंडमध्ये यूजरचे लोकेशन घेण्यापासून रोखले जाते. सेन्सेटिव्ह माहितीच्या अगोदर अ‍ॅप्सला परवानगीची आवश्यकता भासते.

गुगल अँड्रॉईड 12 सोबत यामध्ये एक स्टेप पुढे जात आहे. कंपनीने अँड्रॉईड 12 च्या दोन मेजर फिचरबाबत सांगितले. अँड्रॉईड 12 सोबत यूजर्सला प्रायव्हसी डॅशबोर्ड आणि प्रायव्हेट कॉम्प्यूट कोअर फिचर्स दिली जातील. प्रायव्हसी डॅशबोर्डद्वारे यूजर्सला समजेल की, अ‍ॅप्सकडून कधी फोनचा कॅमेरा, मायक्रोफोन किंवा डिव्हाईस लोकेशन अ‍ॅक्सेस केले गेले.

प्रायव्हसी डॅशबोर्डवरून समजेल की, अ‍ॅपने मागील 24 तासात कितीवेळा फोनचा कॅमेरा, मायक्रोफोन किंवा लोकेशन अ‍ॅक्सेस केले. यातून तुम्हाला एक क्विक ओव्हर व्ह्यू सुद्धा मिळेल कोणत्या अ‍ॅपकडे कोणत्या प्रकारची परवानगी आहे. फोनचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन यूज झाल्यास अँड्रॉईड 12 मध्ये एक इंडिकेटर सुद्धा यूजरला दाखवला जाईल. यासोबतच टुगल सुद्धा दिला जाईल ज्यामुळे यास डिसेबल करता येऊ शकते.

ज्या अ‍ॅप्सला लोकेशनची परमिशन हवी असेल त्यासाठी अँड्रॉईड 12 एक नवीन सेटिंग यूजर्सला ऑफर करेल. नवी सेटिंग यूजर्सला ऑफर करेल. यामुळे तुम्ही आपल्या एग्झीट लोकेशन ऐवजी अ‍ॅपरॉक्सीमेट लोकेशन शेयर करू शकता. याशिवाय एक टुगल दिला जाईल ज्याद्वारे तुम्ही कॅमेरा आणि मायक्रोफोन अ‍ॅक्सेस सर्व अ‍ॅप्ससाठी एकाच वेळी डिसेबल करू शकता. सध्या हे पिक्सल फोनमध्ये असेल परंतु नंतर हे इतरही डिव्हाईससाठी जारी केले जाईल.

आणखी एक महत्वाचे फिचर अँड्रॉईड 12 सोबत येईल ते प्रायव्हेट कॉम्प्यूट कोअर आहे. हे फिचर तुमची माहिती प्रायव्हेट ठेवते. या माहितीमध्ये अल-ड्रायव्हन फीचर्स, लाईव्ह कॅप्शन, नॉऊ प्लेईंग आणि स्मार्ट रिप्लायचा समावेश आहे. हे ऑपरेटिंग सिस्टमपासून सेफ पार्टिशनमध्ये ठेवले जाईल. यामुळे ते सुरक्षित राहील.

नवीन फिचर्स काही प्रायव्हसी फोकस फिचर जसे सर्चमध्ये क्विक डिलीट, गुगल फोटोजमध्ये लॉक्ड फोल्डर, लोकेशन हिस्ट्री रिमायंडर मॅप्सबाबत सांगितले गेले.