GJ : जामनगरमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणिसंग्रहालय; Reliance ने घेतला पुढाकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील जामनगर (Gujrat Jamnagar) येथे जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय उभारण्याच्या प्रकल्पावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) काम करीत आहे. येत्या २ वर्षात याची उभारणी करीत पर्यटकांसाठी खुलं करण्यात येईल. असं सांगितलं जात आहे.

हे प्राणीसंग्रहालय २८० एकर जागेत बनविण्यात येईल. जामनगर जेथे रिलायन्स रिफायनरी आहे, त्याच्याजवळ मोती खावडी येथे प्राणीसंग्रहालय उभारण्यात येईल. यंदाच्या वर्षी लॉकडाऊन आणि कोरोनामुळे या प्रकल्पाला दिरंगाई झाली आहे. मात्र पुढील २ वर्षात हा प्रकल्प तयार होईल, असे सांगितलं जात आहे. रिलायन्सचे कॉर्पोरेट अफेअर डायरेक्टर परिमल नाथवानी यांनी सांगितलं की, या प्रकल्पला ग्रीन्स जियोलॉजिकल रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन किंगडम नाव देण्यात येईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांकडून परवानगी घेण्यात आली आहे. ( building a worlds largest zoo Reliance took the initiative)

हे जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय (Gujrat-Jamnagar big zoo) असेल असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये विविध जातीचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे जीव ठेवण्यात येतील. येथे आणणारे प्राणी जगातील विविध भागातून आणण्यात येईल. हा प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एमडी मुकेश अंबानी यांचे लहान पूत्र अनंत अंबानी पाहत आहेत.

असा असेल प्राणीसंग्रहालयाचा नकाशा
येथे प्राण्यांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात येईल. प्राण्यांच्या प्रजातीमध्ये बार्किंग डियर्स, फिशिंग कॅट्स, स्लोथ बीयर्स (अस्वल), लांडगे, कोमोडो ड्रॅगन्स सारखे मुख्य आकर्षण असेल. याशिवाय आफ्रिकी सिंह, जगुआर (बिबट्या), चित्ता, २० जिराफ, १२, आफ्रिकी हत्ती, सारंग सारखे प्राणीदेखील असतील. अशातच फ्रॉग हाउसमध्ये तब्बल २०० विविध प्रकारचे तर एक्वेटिक किंगडममध्ये ३५० प्रकारचे मासे असतील. प्राणीसंग्रहालयात सर्व प्राण्यांसाठी वेगवेगळा विभाग असेल. यामध्ये फॉरेस्ट ऑफ इंडिया, फ्रॉग हाउस इंसेक्ट, लाइव ड्रॅगन लँड, एग्जॉटिका आयलँड, वाइल्ड ट्रेल्स ऑफ गुजरात, एक्वेटिक किंगडम आदी नावाने विभाग तयार करण्यात येईल.