म्हणून सेवानिवृत्तीच्या एक दिवस आगोदरच ‘हा’ IPS अधिकारी झाला ‘बडतर्फ’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – बिल्किस बानो प्रकरणात गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आर. एस भगोरा यांना सेवानिवृत्त होण्याच्या एक दिवस आगोदरच बडतर्फ करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने २००२ मधील बिल्किस बानो प्रकरणात भगोरा यांना दोषी ठरवण्यात आले होते. आर.एस. भगोरा हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यांना ३० मे रोजी बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने भगोरा यांना बडतर्फ करण्यासंदर्भात गुजरात गृह विभागाला २९ मे रोजी कळवण्यात आले होते. भगोरा हे राज्य पोलीस दलात अधिकारी होते. तसेच त्यांना २००६ मध्ये आयपीएस कॅडर प्रदान करण्यात आले होते. बडतर्फ केल्यानंतर भगोरा यांना कोणतेही लाभ मिळणार नाहीत.

भगोरा यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी बिल्किस बानो प्रकरणात हालगर्जी पणा केला आहे अशा सर्व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मार्चमध्ये गुजरात सरकारला सांगितले होते.

काय आहे प्रकरण ?
३ मार्च २००२ रोजी राधिकापूर येथे बिल्किस बानोच्या कुटुंबीयांवर हल्ला झाला होता. त्यावेळी कुटुंबियांची हत्या करण्यात आली होती. तर बिल्कीसवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्या वेळी ती पाच महिन्यांची गर्भवती होती. ही घटना गोध्रा दंगलीनंतर घडली होती. यामध्ये तिच्या कुटुंबातील सहा सदस्य मारेकऱ्यांच्या ताब्यातून सुटले होते.