योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठात 83 जणांना कोरोनाची बाधा

हरिद्वार : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वारमधील पतंजली योगपीठामध्येही कोरोने शिरकाव केला आहे. योगपीठात तब्बल 83 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पतंजली योगपीठच्या अनेक संस्थांमध्ये दररोज कोरोना रुग्ण सापडत असल्याचे समोर आले आहे. हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभू झा म्हणाले की, 10 एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 83 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या रुग्णांना पतंजली परिसरात आयसोलेट केले आहे. दरम्यान आता संस्थेथील इतर लोकांसह बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषधही आणले होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे औषध खूप फायद्याचे ठरेल असा दावाही त्यांनी केला होता. हे औषध वादातही सापडले होते.