5000 वर्षाच्या इतिहासात कधीही कोणत्याही ‘हिंदू’ राजानं कोणती पण ‘मशिद’ नाही तोडली : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले की, पाच हजार वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत अशी कोणतीही अशी घटना घडली नाही की, एखाद्या हिंदू राजाने एखादी मशिद तोडली आहे आणि तलवारीच्या धाकावर जबरदस्तीने धर्मांतर केले. आपली हिंदू संस्कृती, आपली भारतीय संस्कृती प्रगतीशील आहे, सर्वसमावेश आहे, सहिष्णुसुद्धा आहे, ती संकुचित नाही, जातीयवादी नाही. गडकरी म्हणाले, जर हिंदुस्तान भविष्यात जिवंत ठेवायचा असेल, तर सावरकर विसरून चालणार नाही. जर 1947 विसरून गेलात, तर मला वाटते की भविष्यातील दिवससुद्धा चांगले जाणार नाहीत. हे मी जबाबदारीने बोलत आहे.

तर समजावाद राहणार नाही आणि लोकशाहीसुद्धा
अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात बोलातना गडकरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकीद दिली होती की, कोणत्याही पवित्र धर्मस्थळाचा अवमान होऊ नये, महिला कोणत्याही धर्माच्या असल्या तरी मातेसमान त्यांचा सन्मान करा. सावरकरांनी राष्ट्रवादी विचार दिले होते, जे आज आपल्याला जरूरी आहेत. जर त्याकडे आपण लक्ष दिले नाही तर एकदा आपण देशाची फाळणी केली आहे, जर असेच राहिले तर आपल्या देशात नव्हे तर जगात, ना समाजवाद राहणार, ना लोकाशाही, ना धर्मनिरपेक्षता राहणार.

सेक्युलरचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही
सावरकर दर्शन प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संमेलनात गडकरी म्हणाले, सेक्युलरचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलरचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे. हे हिंदू संस्कृतीचे नैसर्गिक स्वरूप आहे. आपण सर्व संस्कृतींना सन्मान दिला आहे. विविधतेत एकता हे आपले वैशिष्ट्य आहे. आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील होऊन सुद्धा खर्‍या अर्थाने सर्वधर्म समभाव करत पुढे जायचे आहे. परंतु, मायनॉरिटीचे किंवा कोणत्याही कम्युनिटीचे तुष्टीकरण करणे हे सेक्युलर नाही.

सावरकरांचा उल्लेख करताना गडकरी म्हणाले, त्यांनी एका भाषणात म्हटले होते की, ज्या देशात 51 टक्के मुस्लिम आहेत, त्या देशात ना लोकशाही आहे, ना समाजवाद आहे, ना धर्मनिरपेक्षता आहे. हे तोपर्यंत चालेल जोपर्यंत मेजॉरिटी मुस्लिम होत नाही. मेजॉरिटी मुस्लिम झाल्यानंतर तो देश कसा चालतो याच्यासाठी पाकिस्तान, सीरियाकडे पाहावे. मुस्लिम समाजात सुद्धा प्रगतीशील आणि उदारवादी लोक आहेत. त्यांना शिक्षणाचा प्रसार हवा आहे आणि भविष्य ज्ञान-विज्ञानाशी संबंधीत असावे असे वाटते. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरूद्ध नाही. आम्ही सर्वसमावेशी, उदार आणि सहिष्णु आहोत. आम्ही मुस्लिमांच्या विरूद्ध नाही, मुस्लिम संस्कृतीच्या विरूद्ध नाही. जे दहशतवादी आहेत, जे फंडामेंटलिस्ट आहेत, जे म्हणतात की आम्ही चांगले, आणि बाकी सर्व काफिर आहेत, सर्वांना पळवा – आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरूद्ध आहोत.

सावरकरांना समजून घेतल्याशिवाय टिप्पणी चुकीची
गडकरी म्हणाले, सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबाने आणि खासकरून त्यांच्या कुटुंबातील महिलांनी अनेकदा अपमान सहन केला. जेव्हा सावरकरांबाबत कुणी चुकीचे वक्तव्य करतात, तेव्हा डोळ्यात अश्रू येतात. कारण त्यांचे विचार समजून न घेता वक्तव्य केली जातात, जी दु:खद असतात. सावरकरांच्या बाबतीत वास्तवाच्या विरूद्ध प्रतिमा ही गंभीर समस्या आहे. आमची ही कमतरता आहे की, आम्ही त्यांना मांडण्यात जेवढे यशस्वी व्हायला हवे होतो, तेवढे झालो नाहीत. अशा देशभक्ताला संकुचित राजकारण करणार्‍यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला.